Bhagat Singh Koshyari mumbai bhagatsinh koshyari
मुंबई

"राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये"; मनसेनं फटकारलं

मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका भाषणात मुंबई शहराबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली असून राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये, अशा शब्दांत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. (governor should not be speak on what he does not know says MNS)

देशपांडे म्हणाले, ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास माहिती नाहीतर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी आपलं नाक खुपण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. इथं बाकी लोक आले आणि स्वतःची प्रगती करुन घेतली. १०५ हुताम्यांमुळं मुंबई महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही तर नको त्या गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये, असं आमचं स्पष्ट मत आहे.

मनसे स्टाईलनं उत्तर देणार?

राज्यपालांना आम्ही पहिल्यांदा वॉर्निंग देतोय की, त्यांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. इथे राज्यपाल म्हणून आला आहात तर आम्ही तुमचा आदर करतो. त्यांच्या पदाचा आदर करतो. गुण्यागोविंदानं त्यांनी महाराष्ट्रात रहावं. नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT