मुंबई

विद्यासागर राव यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.03) शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला.

राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैद्राबादकडे रवाना झाले. या छोटेखानी निरोप सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री  गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांकडून जनतेचे आभार
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्यातील जनतेचे त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

नव्या राज्यपालांचा शपथविधी गुरुवारी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झालेले राज्याचे नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 6 वाजता राजभवन येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

MS Dhoni Fitness: धोनीला तंदुरुस्त होण्यास किती वेळ लागेल सांगणे अवघड, ब्रेव्हिस...; CSK च्या ताफ्यातून धक्कादायक बातमी समोर

SCROLL FOR NEXT