maid 2 
मुंबई

मोठी बातमी :  घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश द्या; खुद्द सरकारनेच केली सूचना...

वृत्तसंस्था

मुंबई : घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्यावरुन वाद सुरु असताना आता त्यासंदर्भात राज्य सरकारनेच पुढाकार घेतला आहे. सोसायटीत घरकाम करणाऱ्यांनाच नव्हे तर दूध, भाजी विक्रेत्यांसह वर्तमान पत्र विक्रेत्यांना प्रवेश देण्याची सूचना केली आहे. 

मोठी बातमी - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेत अटक...​

घरकाम करणाऱ्यांनासह काम करणाऱ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या सोसायटी तसेच बिल्डींगवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. त्याचबरोबर कोरोना झालेल्यांना तसेच त्यातून बरे होत असलेल्यांना वेगळे वागवल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई तसेच पुण्यातील अनेक सोसायटी कोरोना रुग्णांबाबत सरकारचे नियम डावलून आपले नियम अमलात आणल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. 

मोठी बातमी - मातेच्या गर्भातच बाळांना कोरोनाची लागण, मुंबईत जन्मताच तीन बालके कोरोना पॉझिटिव्ह​

बुजुर्गांकडे अनेक घरकाम करणारे असतात. मात्र सोसायटीचे पदाधिकारी आपली खास नियमावली तयार करुन घरकाम करणाऱ्यांना प्रतिबंध करतात. त्यामुळे अनेकांना त्रास होतो. काही सोसायटींनी ड्रायव्हर, फेरिवाले, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्सना प्रवेश दिला आहे, पण घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. राज्य सरकारने या महिन्याच्या सुरुवातीस घरकाम करणाऱ्यांना प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. 

पुणे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेने घरकाम करणाऱ्यांना कोरोना झाल्यास चौदा दिवसांची भरपगारी रजा देण्याची सूचना केली आहे. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT