मुंबई

GrampanchayatElectionResult | मुरबाड तालुक्‍यात 39 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

मुरलीधर दळवी

मुरबाड : मुरबाड तालुक्‍यातील ग्राम पंचायत सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप समर्थक मोठ्या संख्येने निवडून आले असले तरी नक्की कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले ते स्पष्ट झाले नाही. 44 ग्रामपंचायतीपैकी शिवसेना नेते व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी 32 ग्राम पंचायतीमध्ये सेनेला बहुमत मिळाल्याचे सांगितले. तर भाजप मुरबाड तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी 33 ग्राम पंचायतीमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचे सांगितले. 

तालुक्‍यातील एकूण 44 ग्रामपंचायतीच्या 338 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी पाच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते. एकूण 178 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. म्हणजेच बाकी 39 ग्रामपंचायतीतील उर्वरित 160 सदस्यांच्या मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अद्याप सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले नाही. त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले ते स्पष्ट होणार आहे. 
Grampanchayat Election Result 39 Gram Panchayats in Murbad taluka announced

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT