Uddhav-Thackeray-Mumbai-Local 
मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक दिवसाच्या लोकल प्रवासासाठी मिळणार तिकीट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबई लोकल संदर्भात मोठी बातमी येत आहे. आता मुंबईकरांना एक दिवसाचा प्रवास करण्यासाठी लोकलंच तिकीट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जातो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंधनासहित लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता या बंधनामध्ये सूट देत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट मिळणार आहे. उद्या सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे.

राज्य सरकारने लोकलची तिकीट्स विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते, मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला, रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अश्या सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.

मात्र, हे तिकीट लसीकरण पूर्ण झालेल्यांना मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे तिकीट नागरिकांना मिळू शकेल मात्र, लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना मिळू शकणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत फक्त पासवाल्यांनाच लोकलचा पर्याय वापरता येत होता. मात्र, एका दिवसासाठी प्रवास करु इच्छिणाऱ्यांची यामुळे अडचण होत होती. त्यांना लोकल सोडून बेस्ट अथवा टॅक्सीचा पर्याय वापरावा लागायचा. मात्र, आता या निर्बंधांमध्ये शिथिलता आणत लोकल प्रवास एक दिवसासासाठी देखील सुरु करण्यात येणार आहे. एक दिवसाच्या प्रवासाचं तिकीट नागरिकांना प्राप्त होणार आहे. मात्र यासाठी लसीकरण होऊन 15 दिवस झालेले असणे, नेहमीप्रमाणे बंधनकारक असणारच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT