footware 
मुंबई

‘ग्रीन सोल’चा अनवाणी पायांना मायेचा ओलावा! हजारो गरजुंना दिले मोफत पादत्राणे

सकाळ वृत्तसेवा

पनवेल - आर्थिक परिस्थितीमुळे खेडेगाव, झोपडपट्टी आणि पाड्यातील कुटुंब दैनंदिन काम करून उदरनिर्वाह करतात. पनवेल, रायगड, भिंवडी, पालघर परिसरातील पंधरा हजारांहून अधिक नागरिकांसह शालेय मुलांना मोफत पादत्राणांचे वितरण करून मायेचा ओलावा देण्याचे काम ‘ग्रीन सोल’ या सामाजिक संस्थेकडून करण्यात येत आहे.

गर्भश्रीमंत व्यक्ती बूट फाटले तर, लगेच नवीन बूट खरेदी घेतात. मात्र, झोपडपट्टी, खेडेगावातील मजूर, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना पादत्राणे विकत घेणे देखील परवडत नाही. अशांसाठी जोडे, चप्पल, सँडल आदी प्रकारचे पादत्राणे संकलित करून टाकाऊ चप्पलांची पुनर्निर्मिती करून त्याचे वितरण करण्याचा संकल्प २०१५ मध्ये ग्रीन सोलची सुरुवात श्रेयस भंडारे आणि रमेश धानी यांनी केली होती.

सुरुवातीला राजस्थानपासून सुरू केलेला हा उपक्रम देशभरात सुरू आहे. या संस्थेने सात वर्षात पाच लाखांहून अधिक चप्पलांचे वाटप केले आहे. या माध्यमातून समाजात एकीकडे महागडी ब्रँडेड पादत्राणे वापरणारा घटक असताना दुसरीकडे साधी पादत्राणे वापरण्याची सोय नसलेला वर्गामधील विसंगती दूर करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.

विविध स्तरांतून शाबासकीची थाप

टाकाऊ स्वरूपाच्या चपला, जुने कपडे संकलित करून त्यांची पुनर्निर्मिती करून शालेय मुलांना स्लीपर चप्पल, स्कूल बॅग, आसनपट्टी करून वितरण करण्याचे काम ही संस्था करत आहे. खारघर शहरातील विविध सोसायट्यांबरोबरच पनवेल पालिकेने ग्रीनसोलच्या उपक्रमांना शाबासकीची थाप दिली आहे.

"देशभरात विविध ठिकाणी संकलन केंद्र आहे. संस्थेकडून काही व्यक्तीची मानधनावर नियुक्ती करून गाव आणि पाड्यात सर्वेक्षण करून माहिती एकत्र करून शालेय विद्यार्थी, नागरिकांना चप्पलचे वितरण करून समाजसेवेचे काम सुरु आहे. "

- श्रेयस भंडारे, संस्थापक, ग्रीन सोल संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

SCROLL FOR NEXT