kavthe 
मुंबई

शिलालेख उभारून हुतात्मा अंबादास पवार यांना अभिवादन

पुरुषोत्तम डेरे

कवठे - मुंबई वरील सहवीस अकराच्या हल्यात प्राणपणाने बाजी लावणारे कवठे ता.वाई येथील हुतात्मा अंबादास पवार यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त शिलालेख उभारून अभिवादन केले.

याच दिवशी कवठे गावाच्या या शूरवीराने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथील अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना देशासाठी आपले बलिदान दिले. प्रती वर्षी कवठे ग्रामस्थांच्यावतीने या दिवशी हुतात्मांना अभिवादन करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. यंदाचा हा हुतात्मा दिन कवठे ग्रामस्थांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यामध्ये कवठे येथील ग्रामस्थांनी श्री शिवाजी विद्यालय सुरूर येथे हुतात्मा अंबादास पवार यांच्या कार्याची माहिती देणारा सुवर्ण अक्षरातील शिलालेख उभा केला. तसेच कवठे येथील प्राथमिक शाळेत कवठे गावातील सर्व हुतात्म्यांची माहिती असलेल्या शिलालेखाचे व हुतात्मा अंबादास पवार यांच्या प्रतिमेचे पूजन या निमित्ताने कवठे ग्रामस्थांनी केले. 

शिवाजी विद्यालय येथील शिवाजी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर व माधवराव डेरे होते. यावेळी माधवराव डेरे म्हणाले हुतात्मा अंबादास पवार यांच्या कार्याची माहिती या परिसरातील शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हृदयावर कोरली जावी व त्यापासून प्रेरणा घेवून विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयीची आदर भावना वृद्धींगत व्हावी व हेच विद्यार्थी सैन्यभरती साठी प्रेरित व्हावेत यासाठी हा शिलालेख उभारला केल्याचे सांगितले. कवठे प्राथमिक शाळेतसुद्धा या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, उपसरपंच संदीप डेरे, केशव पिसाळ, मारुती पोळ, जयवंत पोळ, आनाद्रव डेरे, नितीन करपे, गिरीश पोळ, हणमंत डेरे, हेमंत मोरे व विनोद पोळ, शशिकांत करपे, सुधाकर डेरे, सुनील पवार, मुख्याध्यापक प्रकाश थोरात, प्रकाश सोनावणे तसेच शिक्षक वर्ग व कवठे ग्रामस्थ  उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT