मुंबई

मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा प्रश्न सुटला, चालतं-फिरतं बुक हाऊस 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव पाहायला मिळतोय. तसंच लॉकडाऊन असल्यामुळे शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था बंद आहेत. अनेक ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लहानपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताहेत. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मुलांना पुस्तकं आणि इतर अभ्यासाचे साहित्य मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. अशा मुलांसाठी मुंबईत एका गटानं विनामूल्य बुक हाऊस सुरु केलं आहे. 

मुंबईच्या सायन फ्रेंड्स सर्कलने मोबाइल बुक स्टोअर सुरू केलंय. या बुक स्टोअरमधून मुले त्यांच्या गरजेनुसार पुस्तके घेऊन घरी जाऊ शकणार आहेत. त्यामुळे त्या मुलांचा अभ्यास सुलभपणे होईल. तसंच ज्या मुलांकडे अतिरिक्त पुस्तके किंवा दुसऱ्या इयत्तेची पुस्तकं असतील ते या स्टोअरमध्ये दान ही करु शकणार आहेत. जेणेकरुन इतर मुलांना ते फायदेशीर ठरेल. 

मुलांचे वर्ग पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे पण स्टेशनरी दुकाने बंद आहेत. मुले या पुस्तकात शिकू शकतील म्हणून मी या चालत्या फिरत्या पुस्तक घरातून काही पुस्तके घेतली असल्याचं मुंबईतील एका पालकांनी सांगितले. 

लॉकडाऊन असल्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांना पास करण्यात आलं. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा नवीन इयत्तेचा अभ्यास सुरु झाला. मात्र नव्या इयत्तेतील पुस्तक नसल्यामुळे मुलांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अशातच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. पण पुस्तकं हातात नसल्यानं काही विषय समजत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. त्यामुळे या चालत्या फिरत्या बुक स्टोअर मुंबईतल्या मुलांना नक्कीच फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT