मुंबई

मुंबईत कोरोनाबाधितांची वाढ थांबेना; गेल्या 24 तासात 2440 नवे रुग्ण; तर 42 जणांचा मृत्यू 

मिलिंद तांबे

 
मुंबई : मुंबईत आज 2,440 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,09,934 झाली आहे. रुग्णवाढीचा दर 1.06 टक्के इतका गेला आहे. मुंबईत आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,011 वर पोहोचला आहे. मुंबईत आज 1,358 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर 82 टक्के इतका झाला आहे. 

मुंबईत आज झालेल्या 42 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 42 रुग्णांपैकी 11 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते; तर 31 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. दरम्यान, आज 1,358 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,72,036 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 66 दिवसांवर गेला आहे; तर 1 ऑक्‍टोबरपर्यंत एकूण 11,44,744 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 25 सप्टेंबर ते 1 ऑक्‍टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.06 इतका आहे. 

मुंबईत 667 वस्त्या आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत; तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 10,637 असून गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात 14,918 अतिजोखमीच्या व्यक्ती आल्या आहेत. 
----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT