मुंबई

रेल्वे म्हणते, जीआरच नाही! डबेवाल्यांच्या लोकल प्रवासाचा हिरमोड 

मिलिंद तांबे

मुंबई : राज्य सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली, पण त्यासाठी "क्‍युआर' कोड घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार क्‍युआर कोड काढण्यासाठी गेलेल्या डबेवाल्यांना मात्र सरकारने असा काही निर्णय घेतला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लोकलमधून डब्यांचा पुरवठा करण्याची स्वप्ने बघणाऱ्या डबेवाल्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. 

क्‍युआर कोडची चौकशी करण्यासाठी "मुंबई डबेवाला असोसिएशन'चे पदाधिकार शनिवारी (ता. 3) मध्य रेल्वे कार्यालयात गेले असता त्यांना तेथून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगण्यात आले. डबेवाल्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्याबाबतचा कोणताही जीआर आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांना क्‍युआर कोड देण्यास नकार देत जीआर येईल तेव्हा डबेवाल्यांनी क्‍युआर कोडसाठी अर्ज करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. 

डबेवाल्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे क्‍युआर कोडची माहिती विचारली असता त्यांनी क्‍युआर कोड मिळण्याची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. ज्या डबेवाल्यांकडे ऍण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना त्यांच्या मोबाईलवरून क्‍युआर कोड काढता येईल. त्यानंतर क्‍युआर कोड वापरून लोकलने प्रवास करता येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी डबेवाल्यांना दिली. 


एकतर डबेवाल्यांच्या प्रवासाबद्दल सरकारने अद्याप जीआर काढलेला नाही. इतकेच नाही तर अनेक डबेवाल्यांकडे मोबाईल नाही, तर बहुतांश डबेवाल्यांकडे साधे मोबाईल फोन आहेत. मोजक्‍याच डबेवाल्यांकडे ऍण्ड्रॉईड मोबईल आहेत. त्यामुळे अशिक्षित किंवा अर्धशिक्षित डबेवाल्यांना क्‍युआर कोड मिळवणे अवघड जाणार आहे. डबेवाल्यांकडे स्वतःचे ओळखपत्र आहे, ते ओळखपत्र प्रमाण मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी. 
- सुभाष तळेकर, अध्यक्ष, 
मुंबई डबेवाला असोसिएशन. 

 

-----------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT