mumbai fire loksatta
मुंबई

Avighna Park Fire : ...तर खाली पडलेल्या 'त्या' व्यक्तीचा जीव वाचला असता

भाग्यश्री राऊत

मुंबई : लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क इमारतीला (Avighna park fire mumbai) भीषण आग लागली असून अग्नीशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागताच एक व्यक्ती गॅलरीला लटकला. मात्र, हात सुटून त्याचा मृत्यू झाला. पण, त्याचा जीव कसा वाचला असता? याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनी सांगितले आहे.

१५ मिनिटे गॅलरीला होता लटकून -

इमारतीत १९ व्या मजल्यावर फर्निचरचे काम सुरू होते. तिथे ठिणगी पडून ही आग लागली. अग्नीशमन दलाचे कर्मचारी शिडी लावून वर पोहोचेपर्यंत जीव वाचविण्यासाठी रमेश तिवारी नावाची व्यक्ती गॅलरीमध्ये आली. त्यानंतर त्याने गॅलरीला लटकून राहण्याचा प्रयत्न केला. तो जवळपास १५ मिनिटे गॅलरीला लटकून होता. त्यानंतर त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

...तर वाचला असता जीव

सुरक्षारक्षकांकडे १५ मिनिटे होती. त्या १५ मिनिटांत सुरक्षा रक्षकांनी तिथे गाद्या टाकल्या नाहीत. आज त्यांनी तत्परता दाखवत खाली गाद्या टाकल्या असता तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. त्याला खाली पडताना मी स्वतः पाहिले, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

इमारतीमध्ये आणखी दोन जण अडकले -

इमारतीला लागलेली आग भीषण आहे. पण, या सोसायटीची पूर्ण यंत्रणा कार्यान्वित नव्हती. आम्ही पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेतला. मात्र, पाण्याची यंत्रणा देखील बंद होती. तसेच येथील सुरक्षा रक्षकांमध्ये तत्परता दिसली नाही. अद्यापही इमारतीमध्ये दोघे जण अडकले असून त्यांची स्थिती काय आहे? हे माहिती नाही. या घटनेला पूर्णपणे सोसायटीचे व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार आहे, असेही महापौर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT