Vehicle Purchasing
Vehicle Purchasing Sakal
मुंबई

Gudi Padwa : गुडीपाडव्याचा मुहूर्तावर वाहन खरेदीला थंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

मराठी नववर्षाला घरात नविन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये सोने, घर आणि वाहनांची सर्वाधीक मागणी असते. मात्र, यावर्षी वाहन खरेदीमध्ये प्रचंड घट झाली आहे.

मुंबई - मराठी नववर्षाला घरात नविन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये सोने, घर आणि वाहनांची सर्वाधीक मागणी असते. मात्र, यावर्षी वाहन खरेदीमध्ये प्रचंड घट झाली आहे. मुंबईतील पार्किंग व्यवस्था, वाहतुक कोंडी, प्रदुषण, महांगाई अशा समस्यांसह मेट्रो, बेस्टच्या उत्तम प्रवासांमूळे सुद्धा मुंबईकरांनी यावर्षी नविन वाहन खरेदी करायला नापसंती दाखवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय एक कारण पेट्रोल, डिझेल आणि सिएनजीच्या दरांमध्ये सातत्याने झालेली दरवाढीमूळे सुद्धा वाहन खरेदी घटल्याचे सांगितले जात आहे.

गेल्यावर्षी इंधनाचे दर १०० रूपयांपेक्षा जास्त झाले होते. त्यानंतरही मुंबईकरांनी गुडीपाडव्याला पेट्रोल, सीएनजी वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र,त्यानतंर आता पेट्रोल, डिझेल बरोबर सीएनजीवर धावणाऱ्या वाहन खरेदीला सुद्धा नागरिकांकडून नापसंती दर्शवली जात आहे. परिणाम म्हणजे गुडीपाडव्याचा मुहूर्त सुद्धा टळतांना दिसून येत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगितले जात आहे.

मुंबईकरांना प्रवासासाठी यांचा आधार

बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांसाठी गारेगार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातही आता डबल डेकर वातानुकूलित बस सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रवाशांना किलोमिटर प्रमाणे तिकीट पडत असल्याने मुंबईकरांचा स्वस्त आणि सुरक्षीत प्रवासाची हमी मिळत आहे. त्याशिवाय मेट्रो १, मेट्रो २ अ, मेट्रो ७ मुळे सुद्धा मुंबईकरांचा प्रवास गारेगार झाला असल्याने मुंबईकरांकडून शक्यतो कारचा वापर टाळला जातोय अशी शक्यता आहे.

वाहन चालकांना समस्यांचा डोंगर

मुंबईत सध्या मेट्रोची आणि रस्त्यांची काम सुरू असल्याने रात्रीतुनच रस्ते वनवे होत आहे. अरुंद रस्त्यांमूळे वाहतुक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या सुद्धा उद्भवत आहे. त्याशिवाय इंधनाची दरवाढ आणि मुंबईतील वाढत्या प्रदुषणामूळे वाहन वापरल्याने डोकेदूखी होत आहे. परिणामी मुंबईकरांकडून वाहन वापरण्याचे टाळल्या जात असावे अशीही शक्यता नाकारता येत नाही.

गुडीपाडव्याच्या निमित्ताने वाहन खरेदी कारची आकडेवारी

आरटीओ कार्यालय - गेल्यावर्षी - यावर्षी

ताडदेव - ६५५ - ३३४

वडाळा - ५२६ - २५१

अंधेरी- ५३४ - २८५

बोरीवली - ५१५ - २४०

एकूण - २२३० - १११०

दुचाकी खरेदी

आरटीओ कार्यालय - गेल्यावर्षी - यावर्षी

ताडदेव - १३९० - ८२६

वडाळा - ११२० - ८६३

अंधेरी- ७८६ - ६२३

बोरीवली - ९९६ - ७९८

एकूण - ४२९२- ३११०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT