मुंबई

गुंतवणूक खेचायला गुजरात सरसावला

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत रोड शो; उद्योेजकांशी साधला संवाद

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : गुजरात भारतातील सर्वाधिक गुंतवणूक खेचणारे राज्य असल्याचे सांगत आज मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुंबईत दाखल होत महत्त्वाच्या उद्योगपतींची भेट घेतली. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात गुजरातचा वाटा तब्बल ३२ टक्के असून वीज, पाणी आणि मनुष्यबळ असलेले आमचे राज्य गुंतवणुकीसाठी सर्वात विश्वासार्ह स्थान आहे, असे त्यांनी मुंबईत निवडक निमंत्रितांना संबोधित करताना सांगितले.

जानेवारीत होणाऱ्या व्हायब्रंट गुजरातची प्रसिद्धी करण्यासाठी पटेल यांनी यापूर्वीच दिल्लीत बैठक घेतली होती. मुंबईपाठोपाठ ते विदेशातही गुंतवणूकदारांना भेटणार आहेत. पायाभूत सुविधा, बांधकाम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य सेवा आणि मनुष्यबळ विकासात गुजरात अग्रणी आहे. तो तसाच राहील. आत्मनिर्भर गुजरात ते आत्मनिर्भर भारत हा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी गुजरात सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सीआयआयच्या पश्चिम विभागाचे प्रमुख सुनील चोरडिया या वेळी उपस्थित होते. पटेल यांनी टाटा उद्योगसमूहाचे डॉ. चंद्रशेखर, रिलायन्स उद्योगसमूहाचे निखिल मेसवानी यांच्यासह सन फार्मा, आरपीजी एंटरप्रायजेस, बॅंक ऑफ अमेरिका आदींसह दहा उद्योगसमूहांशी चर्चा केली. २००३ मध्ये नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या व्हायब्रंट गुजरातचे हे १० वे वर्ष आहे. आमच्या राज्यात राजकीय स्थैर्य असल्याने उद्योगांचे प्राधान्य आम्हाला मिळते आहे. येत्या काही वर्षांत गुजरातमध्ये चार गिफ्ट सिटी उभ्या राहत असून ती व्यापार उद्योगाची तीर्थक्षेत्रे ठरतील, असेही आज या शिष्टमंडळाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT