गुलाबराव पाटील 
मुंबई

पालघरमधील पाणीपुरवठा योजना रखडल्या; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना खडे बोल 

पी.एम. पाटील

पालघर  ः पालघर जिल्ह्यातील 90 टक्के पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढवा घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पाटील यांनी योजनांचे काम पुन्हा करण्याच्या सुचना केल्या आहेत. ठेकेदारांना घाबरुन काम करु नका आम्ही तुमच्यापाठीशी आहोत. प्रत्येक गावा गावात घरा घरात पाणी पोहचले पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात आपण पुन्हा बैठक घेणार असून त्यावेळी मला या कामात सुधारणा झालेली दिसली पाहिजे. असे म्हणत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाटील यांनी धारेवर धरले. पाटील आज पालघर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. 

कोविड केअर सेंटर्स बंदचा निर्णय दिवाळी नंतर; रुग्णामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने BMC सज्ज
दरम्यान मोखाडा जव्हार विक्रमगड, वाडा बरोबर डहाणु भागातील अनेक पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजना एकाच ठेकेदारांकडे गेलेल्या असल्याने कामे रखडल्याचा आरोप आमदार सुनिल भुसारा यांनी बैठकीत केला. तसेच ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परीषद चालवतात काय असा सवाल करत व्यासपीठावर उभे राहून ठेकेदारांवर कारवाई करा, त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली. 
गुलाबराव पाटील म्हणाले, पालघर जिल्हातील पाणी योजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाराज असून मुंबईला पाणीपुरवठा करणारा जिल्हा पाणीप्रश्नाबाबत 25 व्या नंबरवर असल्याने मुख्यमंत्री महोदयानी मला पाठवले.पाणी पाजणे अतिशय पुण्याईचे काम असून ते प्रामाणिकपणे करा. 
या बैठकीला खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी ज्योती ठाकरे बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी आदि जिल्हा परिषद सदस्य सभापती अधिकारी उपस्थित होते. 

Gulabrao Patil dissatisfied with Palghar water scheme

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT