gun firing during live orchestra in manpada bar dombivli police  sakal
मुंबई

Mumbai News : लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुरू असतानाच अचानक झाला गोळीबार; मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील बारमध्ये घडली घटना

पार्टी रंगात आली असताना खुर्चीला धक्का लागल्याने अजय सिंग व विकास भंडारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ऑर्केस्ट्रा बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला आणि या वादातून एकाने थेट पिस्तुल काढून दुसऱ्या गटातील तरुणावर गोळी झाडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लाईव्ह आर्केस्ट्रा बारमध्ये ही घटना रात्री 1.15 च्या सुमारास घडली आहे.

जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार असून अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस काय पावले उचलतात हे आता पहावे लागेल.

डोंबिवली मानपाडा परिसरात असलेल्या सेवन स्टार

लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्रीच्या सुमारस अजय सिंग हा मित्रांसोबत दारू पीत होता. त्याच्याच बाजूचा टेबलवर विकास भंडारी हा देखील आपल्या मित्रासोबत दारू पीत बसला होता. पार्टी रंगात आली असताना खुर्चीला धक्का लागल्याने अजय सिंग व विकास भंडारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की सिंग याने संतापाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी विकासाच्या खांद्याला लागली. या हल्ल्यात विकास बचावला असला तरी जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटना घडल्यानंतर अजय सिंग व त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने तपास सुरू केला.

मानपाडा पोलिसांच्या पथकाने अवघ्या तासाभरात पळून गेलेल्या पाच आरोपींचा पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अजय सिंगसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान आरोपीकडून पिस्तूल कुठून आली, ती पिस्तूल लायसन्सची आहे का? असे सवाल आता उपस्थिती केले जात आहेत. मानपाडा पोलीस हद्दीत बरेच लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहेत,त्यामुळे अश्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT