Gunratna Sadavarte in Bigg Boss  Esakal
मुंबई

Gunaratn Sadavarte: बिगबॉसमध्ये गेलेल्या सदावर्तेंवर हायकोर्टाची नाराजी! त्यांना गांभीर्यच नसल्याचा ठेवला ठपका

महत्वाच्या सुनावणींदरम्यान ते गायब झाले असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Gunaratn Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते हे सध्या बिगबॉस या टीव्ही शोमध्ये सहभागी झाले आहेत. यावरुन मुंबई हायकोर्टानं त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदावर्ते यांना गांभीर्य नसल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवला आहे. महत्वाच्या सुनावणींदरम्यान ते गायब झाले असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. इतर वकिलांकडून हायकोर्टाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवादाची वेळ आली तर तेच गायब झालेत, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आज संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलं. तसंच पुढच्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. विरेंद्र सराफ हे युक्तिवाद करणार आहेत. सध्या मराठा आरक्षणासंदर्भातील हायकोर्टातील पूर्णपिठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT