crime news sakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबईत पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार; एकाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: मुंबईतील चुनाभट्टी परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीनासह 3 जण जखमी झाले. पप्पू सुमीत येरुणकर असे मृताचे नाव असून, त्याच्यावर खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून कुख्यात गुंड आहे.

2 गटांमधील पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.या प्रकरणी चुनाभट्टी पोलीसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

चुनाभट्टीच्या आझाद गल्ली भागात रविवारी दुपारी 3.15 च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यानी येरुणकर यांच्यासह एका गटाला लक्ष्य करत किमान 10 गोळ्या झाडल्या. येरुणकर यांच्यासह सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची पुष्टी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र, सायन रुग्णालयातील डॉक्टरानी तपास करून येरुणकर यांना मृत घोषित केले.या प्रकरणी चुनाभट्टी पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी किमान 9 पथके तयार केली. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे

“रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास चुनाभट्टी परिसरात गोळीबाराची घटना घडली, त्यात सुमीत येरुणकर यांचा मृत्यू झाला. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. आरोपींची ओळख पटली असून तपासासाठी 9 पथके तयार करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण वैयक्तिक वैमनस्य आहे,”

- हेमराज सिंह राजपूत. पोलीस उप आयुक्त, मुंबई पोलीस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT