BJP event in badlapur sakal media
मुंबई

निविदा न काढताच जिमखान्याचे भूमिपूजन; शिवसेनेने काळे झेंडे दाखवून केला निषेध

सकाळ वृत्तसेवा

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : हेंद्रेपाडा येथील पालिकेच्या जिमखान्यातील दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावित कामासाठी अद्याप कोणतीही निविदा प्रक्रिया (Tender Procedure) काढण्यात आलेली नाही; मात्र तरीही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा घाट घातला गेला. या कार्यक्रमावेळी पाटील यांच्या आगमनापूर्वी शिवसेनेच्या (shivsena) वतीने काळे झेंडे (black flags) दाखवून निषेध नोंदवण्यात आला. या वेळी निषेध करणाऱ्या शिवसैनिकांना बदलापूर पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतले.

बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाडा येथे जिमखान्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन आज आयोजित करण्यात आले होते. प्रस्तावित कामाची अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अद्याप हे काम कोणास मंजूर झालेले नसताना, तसेच शहरात प्रशासक असताना, एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून हा नियमबाह्य कार्यक्रम कसा काय घेण्यात येतो, असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला.

मात्र या कार्यक्रमापूर्वी शिवसेनेचे शाखाप्रमुख भरत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला; मात्र पाटील यांच्या उपस्थितीपूर्वी हा प्रकार घडला व ताबडतोब बदलापूर पश्चिम पोलिसांनी या निषेधकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT