मुंबई

वृद्धेच्या पोटातून काढला भाज्या-फळांच्या सालीचा अर्धा किलोचा गोळा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई  - आपण जे खातो ते पचते, अशी आपली ठाम समजूत असते; पण ती काहीअंशी खोटी ठरवणारी घटना नुकतीच घडली आहे. ठाण्यात राहणाऱ्या 70 वर्षांच्या साधना परिमल (नाव बदलले आहे) यांच्या पोटातून न पचलेल्या भाज्या व फळांच्या सालीचा तब्बल अर्धा किलोचा गोळा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला आहे. अशा घटना क्वचितच होत असल्याचे सांगण्यात आले. 

बोरिवलीच्या ऍपेक्‍स हॉस्पिटलमध्ये संबंधित महिलेवर शस्त्रक्रिया झाली. साधना परिमल तीन महिन्यांपासून पोटदुखीमुळे आजारी होत्या. त्यांना भूकही लागत नव्हती. तीन महिन्यांत त्यांचे वजन 10 ते 12 किलोने कमी झाले होते. दुखण्याचे नेमके निदान न झाल्याने त्यांना केवळ वेदनाशामक गोळ्या दिल्या जात होत्या. त्यांच्या पोटात ट्युमर असल्याचे आधी वाटत होते; परंतु तो शेवाळासारखा गोळा असल्याचे नंतर तपासणीत दिसले. अशा गोळ्याला वैद्यकीय भाषेत फायटोबिझोअर म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या प्रकारात फळांच्या साली आणि न पचलेल्या भाज्या साचल्यामुळे असे गोळे तयार होतात. तंतुमय अन्नाचे अपुरे सेवन, कमी पाणी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली किंवा आजारपणामुळे बिछान्याला खिळून राहणे, नैराश्‍य व उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी घेतलेली औषधे, लॅक्‍सेटिव्ह आणि एनिमा यांचा गैरवापर अशा अनेक कारणांमुळे पोटात न पचलेल्या अन्नाचा गोळा तयार होऊ शकतो. तो जठरात अडकून राहिल्यामुळे भूक लागत नाही व पोटात अन्न न गेल्यामुळे वजन कमी होते. साधना यांच्या पोटाला छोटेसे छिद्र पाडून लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सेने गोळा काढण्यात आला, असे डॉ. आदिती अग्रवाल म्हणाल्या.

वैद्यक क्षेत्रात अशा घटना फार कमी घडतात. जगभरातील वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशा प्रकारची 120 पेक्षाही कमी प्रकरणे घडली आहेत, अशी माहिती ऍपेक्‍स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ. व्रजेश शहा यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT