Mumbai Sakal
मुंबई

दिव्यांगांची फरपट थांबणार! मोखाड्यात दोन दिवसांचे शिबिर

सदस्य प्रकाश निकम यांनी शल्यचिकित्सकांकडे पाठपुरावा केला होता.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालघर जिल्हा मुख्यालयाला जावे लागते. ही बाब दिव्यांगांसाठी खर्चिक आणि कसरतीची आहे. त्यामुळे मोखाड्यातील दिव्यांगांना तालुक्यातच दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी शल्यचिकित्सकांकडे पाठपुरावा केला होता.

त्याची दखल घेत मोखाड्यात बुधवार (ता. २७) व गुरुवार (ता. २८) दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिराचे आयोजन केल्याचे परिपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता मोखाड्यातील दिव्यांगांची प्रमाणपत्रासाठी फरपट थांबणार आहे. मोखाडा तालुक्यात एक हजारहून अधिक दिव्यांगांची संख्या आहे. सरकारी योजना तसेच सवलती मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोखाड्यातील दिव्यांगांना पालघर जिल्हा मुख्यालयाला जावे लागते.

त्यामुळे दिव्यांगांना वेळ, पैसा, आणि शारीरिक त्रास सहन करत धडपड करावी लागत आहे. ही परवड थांबवण्यासाठी शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेतील सदस्य प्रकाश निकम यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे मोखाड्यात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. निकम यांच्या मागणीची दखल घेत २७ व २८ ऑक्टोबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी दोन दिवस शिबिराचे आयोजन केले असल्याचे पत्रक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी निकम यांना पाठवले आहे. या शिबिरात डॉ. प्रशांत राजगुरू व डॉ. अजय देवघरे या अस्थिरोगतज्ज्ञांसह कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT