मुंबई

धक्कादायक! अपंग महिलेला रेल्वेतून फेकले बाहेर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या अपंग महिलेला धावत्या गुजरात एक्‍स्प्रेसमधून चोरट्यांनी बाहेर ढकलल्याची घटना शुक्रवारी (ता. 13) घडली. या घटनेनेमुळे महिलेला एक पाय गमवावा लागला असून, दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या महिलेवर नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

शुक्रवारी दुपारी अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला येणाऱ्या गुजरात एक्‍स्प्रेसच्या अपंगांच्या डब्यातून नगमा अन्सारी नामक अपंग महिला प्रवास करत होती. दरम्यान, दादर स्थानक सोडल्यानंतर काही वेळात एक व्यक्ती अपंगांच्या डब्यात आली. त्याने दरवाजा आणि खिडक्‍या बंद करण्यास सुरुवात केली. अन्सारी यांना ही बाब खटकल्याने त्यांनी त्या व्यक्तीला विचारणा केली. त्या वेळी आम्ही प्लम्बर असून दुरुस्तीसाठी डब्यात चढल्याचे सांगितले. त्याच वेळी रेल्वेने थोडासा वेग वाढवल्यानंतर त्याने अन्सारी यांच्याकडे किमती वस्तूंची मागणी केली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर त्याने त्यांचे तोंड दाबून धरले आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावली. बॅगमधील मोबाईल आणि रोकड काढून घेत मारहाण केली.

आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने अन्सारी यांना ओढत दरवाज्याजवळ नेले आणि दादर ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धावत्या एक्‍स्प्रेसमधून ढकलून दिले. परिणामी रेल्वे रुळांजवळ पडल्यामुळे अन्सारी यांना एक पाय गमवावा लागला आहे, तर दुसऱ्या पायाला गंभीर इजा झाली आहे. तसेच हातालाही मार लागला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अन्सारी यांना नायर रुग्णालयात दाखल केले. 


अन्सारी यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. 
- संभाजी कटारे, पोलिस निरीक्षक, मुंबई सेंट्रल जीआरपी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT