पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात 
मुंबई

पूरग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये अनेक कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक लोकांचे संपूर्ण संसार उद्‌ध्वस्त झाले. अनेकांनी आपली जवळची माणसे आणि सर्वस्व गमावले; मात्र आता पूर ओसरला असला तरी अनेक गावातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. या महापुरानंतर समाजातील अनेक घटक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले असून, अनेक जण आपले सण-उत्सव कमी खर्चात साजरे करून वाचवलेली रक्कम पूरग्रस्तांसाठी पाठवत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठीचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. 

नवी मुंबईमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून येऊन माथाडी कामगार म्हणून नवी मुंबईत काम करीत आहेत. या कामगारांच्या नातेवाईकांनाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. पुरानंतर सर्वात विदारक स्थिती शेतकऱ्यांची झाली. वर्षभरासाठी साठवलेले हजारो क्विंटल धान्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांचेही अनेक कुटुंबीय नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाऊन पूरग्रस्त कुटुंबाचा आधार बनण्याचा व जमेल तशी मदत करण्याचा निर्धार अनेक नवी मुंबईकरांनी केला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळेदेखील गणपतीची सजावट, बॅंड, स्पर्धा इत्यादीवरील खर्च कमी करून ती मदत पूरग्रस्तांना पाठवत आहेत. महापालिका सभागृहनेते रवींद्र इथापे यांनीदेखील मंडळांना कमीत कमी खर्चात गणेशोत्सव साजरा करण्याचे व पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

देशात कोणत्याही भागात संकट आले, तरी प्रत्येक नागरिक मदतीमध्ये खारीचा वाटा तरी उचलतोच. त्यामुळे मंडळाकडून या वर्षी गणपतीच्या डेकोरेशनचा खर्च कमी करण्यात आला असून, त्याऐवजी वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत म्हणून पूरग्रस्तांसाठी पाठवलेले आहेत.
- अंकुश वैती, शिवछाया गणेशोत्सव मंडळ, तुर्भे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी गावी जात नाही. येथील मित्रांच्या व मंडळातील गणपतींना भेट देतो; मात्र पुरानंतरची परिस्थिती पाहता गावी जाऊन जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न आहे. नेहमीप्रमाणे गणेशोत्सवाची आतुरता आहे; मात्र त्यासाठी अधिक खर्च करण्यास मन धजावत नाही. 
- सूरज पवार, जुईनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

SCROLL FOR NEXT