Akshay Kumar
Akshay Kumar 
मुंबई

गुगलवर पत्ता शोधून अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरचा पत्ता गुगलवर शोधून एका चाहत्याने मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री अक्षय कुमारच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंकित गोस्वामी (वय 20) असे त्याचे नाव आहे.

अंकित हा हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील दतौली गावचा रहिवासी आहे. अक्षय कुमारचा तो चाहता असून, त्याला भेटण्यासाठी तो मुंबईला आला होता. अक्षय कुमारच्या घरचा पत्ता त्याने गुगलवर शोधला होता. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तो अक्षय कुमारच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सुरक्षारक्षकाने त्याला पाहिले आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

'जुहू पोलिसांनी त्याची चौकशी करुन मंगळवारी अटक केली. त्याच्यावर परवानगीशिवाय घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे,' अशी माहिती पोलिस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दिली.

अक्षय कुमारचा चाहता असून, अक्षयला भेटून बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा होती, असे अंकितने तपासादरम्यान सांगितल्याचे पोलिस अधिकाऱयांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात एक 23 वर्षीय युवक 2016 मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी जुहू पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या वर्षी अभिनेता सलमान खानची एक चाहती गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचली आणि आपण त्याची पत्नी असल्याचा दावा करु लागली. पतीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही, असा आरडाओरडा करत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT