Hawkers Sakal
मुंबई

Hawkers : फेरीवाल्यांच्या विरोधातील मुंबई पालिकेची कारवाई लांबणीवर

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेला पुन्हा पीएम स्वनिधी योजनाचे १ लाख टार्गेट दिल्याने आता मुंबईतील फेरिवाल्यांच्या विरोधातील कारवाई लांबणीवर पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेला पुन्हा पीएम स्वनिधी योजनाचे १ लाख टार्गेट दिल्याने आता मुंबईतील फेरिवाल्यांच्या विरोधातील कारवाई लांबणीवर पडली आहे.

मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेला पुन्हा पीएम स्वनिधी योजनाचे १ लाख टार्गेट दिल्याने आता मुंबईतील फेरिवाल्यांच्या विरोधातील कारवाई लांबणीवर पडली आहे. मुंबईला दिलेले उदिष्ट पुर्ण करण्यासाठी एकीकडे यंत्रणा कामाला लागलेली असतानाच कारवाईतील अधिकारी कर्मचारी वर्गही या टार्गेटच्या मागावर आहेत. त्यामुळे फेरिवाल्यांच्या विरोधातील कारवाई काही दिवस थंडावणार हे नक्की आहे. ही कारवाई पालिका निवडणुक संपेपर्यंत लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईतील पदपथावरील फेरिवाले, दुकानदार, पानटपरी चालक अशा अल्पभूधारकांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनातून बॅंकेच्या मार्फेत थेट १० हजार रुपये कर्ज दिले जाते. या योजनाचे पहिले एक लाखाचे टार्गेट मुंबई महापालिकेने डिसेंबर महिन्यात पुर्ण केले. मात्र आता पुन्हा राज्य सरकारने एक लाख फेरिवाल्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे टार्गेट दिले आहे. यामुळे गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून रखडलेली फेरिवाल्यांवरील कारवाई आता पुन्हा तीन महिने अर्थात मार्चपर्यंत लांबणीवर पडणार आहे. यामुळे मुंबईतील फेरिवाल्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबईसह पश्चिम व पुर्व उपनगरांत रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदा फेरिवाल्यांनी ठाम मांडलेले आहे. यांचा सर्वसामान्य नागरिकांसह वयोवृध्द, अपंग आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फेरिवाल्यांवर कारवाई करणारे अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि परवाना विभाग हे पालिकेचे दोन्ही विभाग पीएम स्वानिधी योजनासाठी फेरिवाल्यांकडून अर्ज भरण्यासाठी कामाला लागले आहेत. यामुळे त्यांना फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे मुंबईसह पुर्व आणि पश्चिम उपनगरांत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरिवाल्यांमध्ये वाढ झालेली आहे, असेच चित्र अनेक वॉर्डमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT