hdfc 
मुंबई

Mumbai : एचडीएफसी च्या पाच हजार कोटींच्या बॉण्ड साठी २८ हजार कोटी रुपये जमा

बॉंडला वार्षिक ७.९७ टक्के व्याज मिळणार आहे. या इशूसाठी एचडीएफसी ने जादा वीस हजार कोटी रुपयांचा भरणा स्वतःकडे ठेवण्याचा हक्क मिळवला होता.आज या इशूसाठी बोली लावायला सुरुवात झाल्यानंतर त्याला विमा कंपन्या, पेन्शन फंड,प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड व बँका आदी बड्या दर्जेदार गुंतवणूकदारांनी तात्काळ मोठा प्रतिसाद दिला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशातील सर्वात मोठी गृहकर्ज पुरवठादार संस्था एचडीएफसी ने आज बाजारात आणलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या (रुपी बॉंड) इशू मध्ये थोड्याच कालावधीत गुंतवणूकदारांनी सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा भरणा केला.

या बॉंड ला वार्षिक ७.९७ टक्के व्याज मिळणार आहे. या इशूसाठी एचडीएफसी ने जादा वीस हजार कोटी रुपयांचा भरणा स्वतःकडे ठेवण्याचा हक्क मिळवला होता. आज या इशूसाठी बोली लावायला सुरुवात झाल्यानंतर त्याला विमा कंपन्या, पेन्शन फंड,

प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड व बँका आदी बड्या दर्जेदार गुंतवणूकदारांनी तात्काळ मोठा प्रतिसाद दिला. पाच हजार कोटी रुपयांच्या या इशूसाठी २७ हजार ८६३ कोटी रुपयांच्या ९७ बोली लावण्यात आल्या. एचडीएफसी ने त्यातील ५५ गुंतवणूकदारांचे एकूण पंचवीस हजार कोटी रुपये स्वतः जवळ ठेवले.

या प्रक्रियेतून देशातील बड्या गुंतवणूकदारांचा एचडीएफसी वरील विश्वास दिसतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. देशात गृहनिर्माण क्षेत्राला मोठी मागणी आहे. परवडणाऱ्या घरांपासून ते उच्चभ्रूंच्या घरापर्यंत ही मागणी आहे.

मात्र अजूनही भारतात विशेषतः चांगल्या लहान घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे दीर्घकालात देखील ही मागणी कायम राहणार आहे. त्याकारणाने घरांसाठी अर्थसाह्य देणाऱ्या संस्थांना गुंतवणूकदारांचा असाच पाठिंबा दिर्घकाळ मिळेल, असे एचडीएफसी चे कार्यकारी संचालक व्ही. एस. रंगन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

Virar News : धर्म स्वातंत्र्य कायद्याला कॅथलिक बिशप्सचा विरोध; संविधानिक अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT