मुंबई

इथे माणुसकीही ओशाळली! तो तडफडून मेला, कुणी जवळही नाही गेला... 

मुरलीधर दळवी ः सकाळ वृत्तसेवा

मुरबाड ः "कोरोना'संगे काही नवे शब्द आले. सामाजिक अंतर, हा त्यापैकीच एक. या अंतराने आणि त्याआड लपलेल्या कोरोनाच्या धास्तीने आज एकाचा बळी गेला. आजारपणात लेकाच्या खांद्याचा आधार शोधायला मुरबाडहून पुण्याच्या दिशेने निघालेला एक वृद्ध चक्कर येऊन रस्त्याकडेला तडफडत पडला, मात्र कुणीही त्याच्या जवळ गेले नाही. कारण एकच, त्याला कोरोना असला तर..! जगभर माणुसकीचे दर्शन घडत असताना अशा प्रसंगात मुरबाडमध्ये मात्र माणुसकी ओशाळलेली दिसली. जगभरात कोरोनो विषाणुने थैमान घातले असून कोरोना रुपी राक्षसाने अनेकांचा बळीही घेतला आहे. याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धास्तावलेल्या नागरिकांना संशयाच्या भुताने घेरले आहे. या संशयरुपी भुताने माणुसकीदेखील गिळली असून एका वृध्दाला मदतीअभावी प्राणाला मुकावे लागले आहे. रस्त्याकडेला तडफडत असलेला वृद्ध कोरोना बाधित तर नसेल ना, या भीतीने कुणीही त्याच्या मदतीसाठी न गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

मुरबाड शहरातील सोनारपाडा भागात डोंबिवली येथील वृद्ध रस्त्याकडेला तडफडत असल्याने येथे काही नागरिक जमले. विशेष म्हणजे या ठिकाणी काय चालले, आहे ते बघण्यासाठी आलेल्या नागरिकांपैकी एकानेही वृध्दाची साधी चौकशीही केली नाही. त्याची तडफड ते उघड्या डोळ्याचे पहात उभे राहिले. कदाचित या वृध्दाला कोरोना झाला असेल, म्हणून त्याची ही अवस्था झाली असेल, असा तर्क लावण्यात आणि कुजबुज करण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्यातील एकानेही पोलिस अथवा प्रशासनापर्यंत ही माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी वृद्धाच्या मदतीसाठी अथवा चौकशीसाठी धजावलादेखील नाही. अखेर काही वेळाने रस्त्याकडेला जमलेले नागरिक पाहून पोलिसच तेथे आले. त्यांनी रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर त्याला तीनचाकी रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दरम्यान, मृत्यू झालेल्या वृद्धांचे नाव सीताराम बाबुराव तांबे (वय 74) असे असून तो डोंबिवली येथे रहात होता. त्याला पोट दुखीचा त्रास होत होता. तो चालत ओतूरकडे निघाला होता. कल्याण-मुरबाड रस्त्यावरून पायी येत असताना तो अचानक चक्कर येऊन पडल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याचा मुलगा पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे राहतो. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. 

वृध्दाचा मृतदेह सायंकाळी ओतूर येथे नेण्यात आला. आजपासून तीन दिवस मुरबाड बंद आहे. त्यामुळे एकही वाहन रस्त्यावर नाही. त्यातच संचारबंदीमुळे कोणी बाहेर यायला तयार नाही आणि हा वृध्द अपरिचित असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले असावे, अशी चर्चा आहे.'' 
- दत्तात्रय बोराटे, पोलिस निरीक्षक, मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न

Latest Marathi News Live Update : शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं त्यांचं अभिनंदन- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT