File Photo 
मुंबई

अघोरी कृत्यासाठी तो करायचा मारहाण..

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : अघोरी कृत्य आणि जादूटोणासाठी नकार देणाऱ्या महिलेला भोंदूबाबासह त्याच्या तिघा साथीदारांनी जबर मारहाण केली. तसेच, संशयितांनी तिच्यावर जादूटोणा करण्यासाठी तिच्या केसांची बट कापली. भिवंडी शहरातील कामतघर येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित महिलेने त्यांच्या तावडीतून स्वतःची करत थेट नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मनोज शंकर गोहिल, त्याची पत्नी जया गोहिल, विनोद चव्हाण, गुजराथी महाराज अशी आरोपींची आहेत. यातील भोंदूबाबासह आरोपी गोहिल दाम्पत्य आणि त्यांचा नातेवाईक (सर्व रा. चरणीपाडा, भिवंडी) फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. 28 वर्षांची पीडित महिला भिवंडीतील कामतघर परिसरात पतीसह राहत होती. आरोपी मनोज गोहिलशी प्रेमसंबंध जुळल्याने ती पतीला सोडून मनोजसोबत राहत होती; मात्र काही महिन्यांपूर्वी तिने मनोजच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात अत्याचारप्रकरणी तक्रार दिली होती. त्या वेळी पोलिसांनी मनोजला अटक केली होती.

मनोजची जामिनावर सुटका झाल्यानंतर ती पुन्हा त्याच्यासोबत राहत होती; मात्र मनोजसोबत त्याची पहिली पत्नी जयाही राहू लागल्याने दोघींमध्ये सतत भांडणे होत होती. त्यामुळे पीडित महिलेवर अघोरी कृत्य व जादूटोणा करून तिच्यापासून सुटका करण्याच्या उद्देशाने गोहिल दाम्पत्याने इतर आरोपींच्या मदतीने पीडित महिलेला भिवंडीतील अंजूरफाटा परिसरातील एका सोसायटीच्या खोलीत नेत अघोरी पूजेसाठी बसवले; मात्र पीडित महिलेने नकार देताच आरोपींनी तिला जबर मारहाण करून अघोरी कृत्य व जादूटोणासाठी तिच्या केसांची बट कापली.

पीडित महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करून तिथून पळ काढत नारपोली पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र वाणी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

Rahul Gandhi: 'देशातील काही राज्यात वारंवार भाजपचीच सत्ता का येतेय?'

SCROLL FOR NEXT