विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी मुख्याध्यापकाला चोप दिला. 
मुंबई

मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत, मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे.... 

सकाळ वृत्तसेवा


भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील शेलार गाव नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गातच मुख्याध्यापकाने अश्‍लील चाळे केले. त्यामुळे संतप्त नागरिक व पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी विकृत मुख्याध्यापकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

प्रमोद नायक (३५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मुख्याध्यापक अल्पवयीन विद्यार्थिनीशी एकतर्फी प्रेम करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. भिवंडी-वाडा मार्गावर शेलार गावात हिंदी माध्यमिक शाळा असून या शाळेत १४ वर्षांची पीडिता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता. तीन दिवसांपूर्वीच त्याने तिला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याध्यापक कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र, पीडिता गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने तिचा वर्ग सुरू असताना शिपायामार्फत निरोप पाठवून त्याच्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणून त्याने तिच्याशी अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. 

पालकांसोबत उद्धट वर्तन
पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. आईने नातेवाईकांसह गुरुवारी (ता.२६) सकाळी शाळेत धाव घेऊन त्याला गाठले आणि घडलेल्या प्रकारचा जाब विचारला. मात्र, त्याने उद्धट वर्तन केल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT