health care center in pisavli statement of moreshwar bhoir mumbai marathi news Sakal
मुंबई

Mumbai News : पिसवलीत लवकरच सुरू होणार आरोग्य केंद्र - मोरेश्वर भोईर

माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या पाठपुराव्याला यश

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागातील पिसवली गाव आणि आजूबाजूच्या परिसरात लोकसंख्या वाढत चालली आहे. येथिल नागरिकांना जवळपास आरोग्यकेंद्र नसल्याने त्यांना उपचारासाठी कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालय येथे जावे लागते. आपल्या गावात आणि परिसरात आरोग्यकेंद्र असावे यासाठी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर हे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होते.

भोईर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पिसवली ग्रामपंचायत कार्यालय येथे हे आरोग्य केंद्र लवकरच सुरू होत आहे. या केंद्राचे भूमिपूजन रविवारी भोईर यांच्या हस्ते पार पडले. आरोग्य केंद्राविषयी माहिती देताना भोईर म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगपालिका यांच्या आरोग्य (वेलनेस) निधीतून येथे हे आरोग्यकेंद्र तयार करत आहोत. तसेच या परिसरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना उपचारासाठी लागणारा खर्च त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने या पालिकेच्या आरोग्य केंद्राचा सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल.

दरम्यान येत्या 40 ते 50 दिवसात हे आरोग्यकेंद्र उभारले जाईल. पिसवली गाव तसेच आजूबाजूच्या परिसरात 70 हजारहून अधिक नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांना जवळपास कोणतेही शासकीय आरोग्य केंद्र नाही. हे केंद्र झाल्याने नागरिक, गरोदर महिला सर्वानाच याचा लाभ घेता येईल. महिना दीड महिन्यात हे केंद्र सुरू होईल असे ही भोईर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT