मुंबई - घरी असताना जर तुमची मुलं एकटी खेळत असतील तर त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, मुंबईत राहणाऱ्या अशाच एका 10 वर्षांच्या मुलीच्या पालकांचा निष्काळजीपणा तिच्या जीवावर बेतला असता.
10 वर्षीय नायरा शहा (नाव बदललेलं आहे) हीने दोन वर्षांपूर्वी खेळताना अचानक एक धातूचा पिन गिळला. कुटुंबियांना हे कळल्यावर त्यांनी तातडीने मुलीच्या पोटाचा एक्स-रे काढला. या वैद्यकीय चाचणीत काहीही आढळून आले नाही. चाचणी अहवालात काहीच दिसून न आल्याने सर्वजण चिंतामुक्त झाले. कालांतराने ही घटना विसरून सुद्धा गेले. मात्र, या घटनेच्या दीड वर्षानंतर मुलीला वारंवार खोकल्याचा त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती पाहून कुटुंबियांनी तिला झेन रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर, रुग्णालयातील डॉक्टरांनी या मुलीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.
रूग्णालयातील कान-नाक-घसा शल्यचिकित्सक डॉ. क्षितीज शाह यांनी सांगितले की, “ या मुलीच्या छातीचा एक्स-रे काढला असता तिच्या छातीच्या डाव्या बाजूला खाली वायूमार्गाच्या भागात पिन आढळून आला. हा पिन शोधण्यासाठी छातीचा सीटीस्कॅन काढण्यात आला. त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपीद्वारे फुफ्फुसात अडकलेला हा पिन बाहेर काढण्यात आला. श्वसनमार्गात अडकलेली बाहेरील वस्तू काढून टाकण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी केली जाते. भूल देऊन ही प्रक्रिया करावी लागते. ब्रॉन्कोस्कोपी वापरून फुफ्फुसातील वायुमार्गापर्यत प्रवेश मिळवण्याची ही प्रक्रिया आहे. साधारणतः एक तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तासाभरात मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.”
-------------------------------------------------
( Edited by Tushar Sonawane )
health marathi news pin swallowed two years ago removed lungs mumbai live updates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.