health news Mumbai alert Increase in Dengue Lepto patients within week bjp  esakal
मुंबई

मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, लेप्टोच्या रूग्णसंख्येत आठवड्याभरातच वाढ

मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली, तरी गेल्या आठ दिवसांत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली, तरी गेल्या आठ दिवसांत लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले; तर डेंगीचा प्रादुर्भावही कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे. मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात १२ जुलैला लेप्टोच्या पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे १२ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने १७ जुलैपर्यंत ११ रुग्णांची नोंद झाली आहे.

शहरात डेंगीचा प्रसारही कायम असून, जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या ३९ होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरूच असून जुलैमध्ये २४३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ३५० रुग्ण आढळले होते. डेंगीचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे शून्य रुग्ण नोंदले गेले. पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या तीनवरून ११ वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत राज्यात १५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.

तातडीने उपाययोजना करा : भाजप

मुंबईत डेंगी आणि लेप्टोच्या वाढत्या रुग्णसंख्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी पालिकेला हे पत्र लिहीत या आजारांवर केलेल्या उपाययोजनांच्या कार्यवाहीचा अहवाल मला सादर करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT