मुंबई

मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या उच्चांकी गाठते. त्यासोबतच मृतांचा आकडाही दररोज वाढत चालला आहे. अशातच मुंबईत कोरोनासंदर्भातला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यूचा दाखल न मिळाल्यानं तब्बल 16 तास मृतदेह घरीच ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. कोणताही डॉक्टर मृत्यू दाखला देण्यास तयार न झाल्यानं कुटुंबियांनी मृतदेह 16 तास घरीच ठेवला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय मधुकर जाधव यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. मधुकर हे गेल्या काही दिवसापूर्वी घरी पडले होते. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यानंतर मधुकर यांच्या मृत्यूचा दाखला घेण्यासाठी त्यांचं कुटुंबिय राजावाडी रुग्णालयात गेलं. पण रुग्णालयानं त्यांचा मृतदेह पाहून दाखला देण्यास नकार दिला. त्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनीही मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला. त्यामुळे मधुकर यांच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला, असं कुटुंबियांनी म्हटलं आहे. 

इतकच काय तर, मधुकर यांच्या कुटुंबियांनी रात्रीच खाजगी डॉक्टरांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. मात्र तरीही डॉक्टर तपासण्यासाठी आले नाही. मधुकर यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी टाळाटाळ केल्यानं त्यांचा मृतदेह तब्बल 16 तास घरातच पडून राहिला. 

त्या आजोबांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला 

मुंबईतील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. हे आजोबा 8 जून पहाटेपासून बेपत्ता होते. आज  त्यांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे.  रुग्णालयाच्या निष्काळीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT