मुंबई

कर्जत, खोपोलीत मुसळधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा

खोपोली/कर्जत  : खोपोली शहर व परिसरात संध्याकाळी 5 ते 6.30 च्या दरम्यान जोरदार वारा, विजांचा कडकडाट व गारांसह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या प्रचंड उकड्यानंतर बुधवारी सायंकाळी खोपोलीत जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाने नागरिकांची प्रचंड धांदल उडाली.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेकांच्या घराच्या पत्र्याच्या शेड उडून दूर जाऊन पडल्या. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

खालापुरातही वादळी वाऱ्यासह पाऊस

खालापुरात बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने खालापूरातील अंगणवाडीनजीकच्या मुख्य रस्त्यावर विद्युत खांब तारांसह कोसळल्याची घटना घडली. खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष जंगम, राहुल चव्हाण, आकेश जोशी तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. तुटलेल्या तारा अलग करून रस्त्यातून खांब हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT