मुंबई

मुंबईत बुधवारपासून मुसळधार? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मान्सून सोमवारी केरळ, तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत प्रवेश करेल. सध्या दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत; मात्र चार दिवसांत दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. या वादळामुळे मान्सूनच्या दक्षिण कोकणापर्यंतच्या प्रवेशासाठी पुरेशी आर्द्रता मिळेल. त्यामुळे मान्सूनचे 12 तारखेपर्यंत दक्षिण कोकणातील आगमन जवळपास निश्‍चित असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. शिवानंद पै यांनी दिली. 

दरम्यान, मंगळवारपासून समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छीमारांनी मंगळवारपासून तीन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. 

वादळाची संभाव्य वाटचाल 
- 10 जून- लक्षद्वीपचा आग्नेय भाग, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. या भागांत कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण होईल. 
- 11जून- लक्षद्वीपचा आग्नेय भाग, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर ताशी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. रायगड आणि रत्नागिरीत सोसाट्याचा वारा वाहील. या परिसरात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. 
12 जून- केरळ व कर्नाटकातून अरबी समुद्रातील वायव्य दिशेकडे सरकणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर वादळात होईल. राज्याच्या किनारपट्टीपासून ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडेल. 
- 13 जून- पाकिस्तान व गुजरातदरम्यानच्या अरबी समुद्रात ताशी 110 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. डहाणू व पालघर किनारपट्टीवर ताशी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मुंबई, पालघर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 

हे वादळ राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; मात्र अरबी समुद्रातून पाकिस्तानकडे सरकताना किनारपट्टीच्या समांतर दिशेने जाईल. त्यामुळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग जास्त असेल. समुद्रही खवळलेला असेल. 
- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT