मुंबई

मुंबई, उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

विराज भागवत
  • सखल भागात पाणी साठण्याची भीती; बस सेवांवर परिणाम, चाकरमान्यांचे हाल

मुंबई: राज्यात मुसळधार पाऊस बरसेल अशा इशारा हवामान खात्याने देताच मुंबई (Mumbai) आणि उपनगात (Suburban) पावसाने खरोखरंच हजेरी लावली. मुंबई, उपनगर, ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासूनच पावसाने जोरदार (Heavy Rainfall) हजेरी लावली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मुसळधार पाऊस आणि लोकल (Mumbai Local Trains) सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने चाकरमान्यांचे (Office Going crowd) चांगलेच हाल झाल्याचे चित्र दिसले. भर पावसात हातातील एका हातात ऑफिसची बॅग आणि दुसऱ्या हातात छत्री (Umbrella) सांभाळत चाकरमान्यांना बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. मुंबईत पाऊस पडला की सखल भागात पाणी साठण्याची भीती कायमच असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारे पाणी साठलं तर बससेवांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. (Heavy Rainfall in Mumbai Thane Navi Mumbai Panvel Dadar Office going crowd Local Trains Bus services affected)

पश्चिमी मोसमी वारे अरबी समुद्र किनाऱ्यावर घोंघावत आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. ही परिस्थिती मोसमी पावसासाठी अनुकूल असून येत्या 24 तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, बुधवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्र किनारी पश्चिमी मोसमी वारे वेगाने वाहू लागले आहेत. दक्षिण कोकणात दाखल झालेला मान्सून हळूहळू संपूर्ण राज्यात पसरू लागला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभर मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

मुंबईतील स्थानिक हवामान खात्याने पुढील 5 दिवस हवामानात बदल होण्याचा इशारा दिला असून जोरदार पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.

रायगड , रत्नागिरी मध्ये अतिवृष्टीचा इशारा

गेल्या पाच दिवसात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून हा वेग ताशी 60 किलोमीटर वेगापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यासह 10 आणि 11 जून रोजी गोव्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या काळात आवश्यक तेथे NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी 474 पंप बसविले आहेत. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहतील. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी केली आहे.

मंगळवारच्या दिवसात मुंबईत 100 मिमी पाऊस बरसला. आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरासह बोरिवली, कांदिवली, नालासोपारा, वसई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, डोंबिवली, कल्याण सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

महापालिका सज्ज

मुंबईत अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पालिकेने जोरदार तयारी केली आहे. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता स्पॉटवर राहतील. हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून, यात साचलेले पाणी वळते करून साठविण्याची व्यवस्था आहे अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिली. प्रत्येक वॉर्डात मनपाच्या 5 शाळा तयार ठेवल्या असून, गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल अशी माहिती ही चहल यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT