Flood sakal media
मुंबई

दिवाळीपूर्वी कल्याण तालुक्यातील सर्व पुरग्रस्थांना मदत मिळणार

5 हजार बधितांना मिळाली मदत तर 9 हजारांच्या आसपास प्रतिक्षेत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका (Heavy Rainfall) कल्याण तालुक्यातील (kalyan villages) गावांना देखील बसला आहे. 15 हजाराचा आसपास नागरिक यामध्ये बाधित झाले असून आत्ता पर्यंत 5 हजार बधितांना राज्य शासनाच्या मदतीचे (mva government help) वाटप करण्यात आले असून 9 हजाराच्या आसपास बधितांना येत्या 10 दिवसांत मदतीचे वाटप करण्यात येईल. दिवाळीपूर्वी (diwali festival) सर्व बधितांना मदत मिळवून देण्यात येईल अशी माहिती कल्याण तहसीलदार विजय पाटील (VIjay Patil) यांनी दिली.

जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीचा कल्याण तालुक्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. कल्याण तालुक्यात कल्याण, अप्पर कल्याण, टिटवाळा, म्हारळ बुद्रुक, नडगाव, ठाकुर्ली असे सहा सर्कल येत असून यातील सुमारे 15 ते 16 हजाराच्या आसपास नागरिक बाधित झाले आहेत. बाधित नागरिकांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून त्याचे वाटपही सुरू झाले आहे. कल्याण तालुक्यातील बाधित कुटुंबासाठी प्रत्येकी दहा हजार असे 16 कोटी 36 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे.

आत्तापर्यंत 5 हजार बधितांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले असून 9 ते 10 हजाराच्या आसपास नागरिकांना वाटप होणे बाकी आहे. काही नागरिकांना अनुदान वाटप करण्यात काही अडचणी देखील येत आहेत. मात्र त्याची शहनिशा करत दिवाळी पूर्वी सर्वांना मदत पोहचवण्यात येईल असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT