मुंबई

मुंबईत मंगळवारपर्यंत असा असेल पाऊस, जाणून घ्या अपडेट्स

पूजा विचारे

मुंबईः शुक्रवारी  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा  जोर कायम आहे.  आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरु आहे.  मुसळधार पावसामुळे मुंबईत १ जूनपासून शुक्रवारपर्यंत एक हजार मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. 

१ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेनुसार, २६४५.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद केली आहे. जो १००८.८ मिमी पेक्षा जास्त आहे. याचदरम्यान कुलाबा वेधशाळेनुसार १,००९ मिमी जास्त पाऊस पडला.

मुंबईत मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज IMD नं वर्तवला आहे. याचसोबत मुंबईत येलो अलर्टचा इशारा दिला आहे. शनिवारी ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंन्ज अलर्टचा इशारा दिला आहे. येत्या पाच दिवसात कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुर्दुग आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शुक्रवारी काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडला. शुक्रवारी ९ तासानंतर  संध्याकाळी ५.३० वाजता, सांताक्रूझ वेधशाळेत १४.४  मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबा वेधशाळेत १०० मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी २४ तासात सकाळी ८.३० वाजता, सांताक्रूझ वेधशाळेत ४१.४ मिमी तर कुलाबा वेधशाळेत २१.६ मिमी पावसाची नोंद झाली. 

२४ तासांच्या अंदाजानुसार शहर आणि त्याच्या आसपासच्या भागात अधून मधून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने येत्या २४ तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. तसंच पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

Heavy rainfall Mumbai till Tuesday Yellow alert IMD

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

SCROLL FOR NEXT