मुंबई

मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा तडाखा, अर्धे टिळकनगर पाण्याखाली...

मिलिंद तांबे

मुंबई - रात्रभर बसणाऱ्या पावसाने पूर्व उपनगरांना झोडपून काढले. कुर्ला, चेंबुरमध्ये काही घरातही पाणी शिरलंय. रेल्वे रुळावर पाणी आल्याने हार्बर सेवा ठप्प झालीये.  

मुंबईत रात्रभर  मुसळधार पाऊस कोसळला, तर सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पूर्व उपनगरात चेंबूर, कुर्ला आणि  टिळकनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. 

कुर्ला, चेंबूर या भागात काही घरात पाणी शिरलंय. दमदार पावसानंतर अर्धे टिळकनगर पाण्याखाली असून, या भागात सर्वत्र दिड ते दोन फूट पाणी आहे. नेहरूनगर, चेंबूरच्या शेल कॉलनी आणि पोस्टल कॉलनीत पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत चालावं लागतय. 

रुळावर पाणी साचल्यामुळे हार्बर मार्गावरची अत्यावश्यक लोकलची वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबूर ते टिळकनगर आणि टिळकनगर ते कुर्ला तसच चूनाभट्टी या स्थानकादरम्यान रुळावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून आता काही ठिकाणी पाणी निचरायला सुरुवात झाली आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

heavy rainfall slams eastern suburbs of mumbai half tilaknagar is in water 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

Amazon Great Freedom Sale 2026 : 7 ऑगस्टपासून धमाकेदार सेल; 'या' 10 वस्तूंवर मिळणार 50% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT