helmet attack on traffic police over action Accused arrested mumbai crime  sakal
मुंबई

Mumbai Crime : वाहतुक पोलिसाने कारवाई केली म्हणून हेल्मेटने हल्ला; आरोपी दुचाकीचालकाला अटक

विनापरवाना दुचाकी चालवल्यामुळे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली असता दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोक्यात हेल्मेट मारल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विनापरवाना दुचाकी चालवल्यामुळे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली असता दुचाकीस्वाराने पोलिसाच्या डोक्यात हेल्मेट मारल्याची घटना रविवारी रात्री सायन परिसरात घडली आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुचाकीचालक तौसिफ अब्दुल माजिद खानला अटक केली आहे.

आरोपी कुर्ला एलबीएस रोडवरील शीतल चित्रपटगृहाजवळ वास्तव्यास आहे.रविवारी रात्री आरोपी सायन परिसरातील माटुंगा वाहतुक पोलीस चौकी जवळील सिग्नलवर असताना हा गुन्हा घडला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिडीत आनंद शेजवळ हे माटुंगा वाहतुक पोलीस शाखेत कार्यरत आहेत. शेजवळ शनिवारी रात्री चौकीजवळील सिग्नलवर वाहतुक नियमनासाठी कार्यरत असताना एक तरूण दुचाकीवरून येत असल्याचे त्यांनी पाहिले.

त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी दुचाकीचालकाला अडवून त्याच्याकडे परवाना मागितला. पण त्याच्याकडे वाहनचालक परवाना नव्हता. त्यामुळे त्यांनी आरोपीवर दंडात्मक कारवाई केली. परंतु आरोपीला राग आला आणि रागात आरोपीने हातातील हेल्मेट शेजवळ यांच्या डोक्यात मारले व तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण वाहतुक पोलिसाने मोठ्या शिताफीने त्याला घटनास्थळावरच ताब्यात घेतले. त्यानंतर सायन पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur : क्रूझरचा टायर फुटला, ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात; ५ भाविकांचा मृत्यू, ७ ते ८ जण जखमी

शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं, तिथेच ठाकरे सेनेचे पंख तुटले; काँग्रेसची ताकद झाली क्षीण, राष्ट्रवादीला करावी लागणार कसरत!

New Labour Rules for Women Workers : महिला आणि गिग कामगारांसाठी मोठी खुशखबर! आजपासून नवे नियम लागू! जाणून घ्या काय सुविधा मिळणार?

Neha : 18 वर्षांचं करियर, 14-15 चित्रपट, 9 तर निघाले फ्लॉप..तरीही आज 40,00,00,000 कोटी संपत्तीची मालकीण, राजकीय घराण्याशी खास कनेक्शन

CET Exam : मार्च ते मे दरम्‍यान परीक्षा! इंजिनिअरिंग, फार्मसीसह विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाणून घ्या

SCROLL FOR NEXT