मुंबई

चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा महाराष्ट्राच्या मदतीला...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली 100 वर्षे जनसेवा करत आले आहे. त्यामुळेच,  मंडळाने देशावर आलेल्या संकटसमयी सेवाभावी वृत्तीने मदतीचा हात पुढे करत 3 लाखांची मदत केली आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळामार्फत जमा झालेले 3 लाख 51 हजार रूपये असा हातभार म्हणून 'मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड 19 ' या निधीसाठी धनादेशाद्वारे संबधित खात्यात जमा केले आहे. 

तसेच, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळाच्या वतीने कोरोनाची माहिती आणि घ्यावयाची काळजी या संबधीचे माहिती पत्रक सोबत डेटॉल, साबण आणि सॅनिटायझरचे वाटप मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांच्या हस्ते नगरसेविका सिंधूताई मसुरकर, मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत, भालेश परब, अतुल केरकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चिंचपोकळीतील इमारतींमध्ये घरोघरी करण्यात आले. 

तसेच, 2019  मध्ये मंडळाने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 5 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध करून दिला होता. या भयावह परिस्थितीवर आपण सर्वांच्या मदतीने नक्कीच मात करण्याचा आशावाद मंडळाचे सचिव श्री वासुदेव सावंत यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

Satara Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेचा वाजला बिगूल; उद्यापासून अर्ज दाखल होणार, एक नोव्हेंबरला मतदान

SCROLL FOR NEXT