Hemant-Nagrale sakal media
मुंबई

हेमंत नगराळे यांनी त्यांच्या पत्नीला थकित पोटगी द्यावी - हायकोर्ट

सुनिता महामुनकर

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant nagrale) यांनी त्यांच्या पत्नीला मागील चार महिन्यांची थकित पोटगी द्यावी (Alimony for wife) असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज दिले. नगराळे यांच्या पत्नीने केलेल्या याचिकेवर (wife petition) नुकतीच न्या ए ए सय्यद आणि न्या एस जी डिगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मागील चार महिन्याची पोटगीची रक्कम नगराळे यांनी थकविली असून असे पहिल्यांदाच होत नाही, असा युक्तिवाद पत्नीच्या वतीने एड पी व्ही नेल्सन राजन यांनी केला.

सध्याची पोटगीची रक्कम वाढविण्यासाठी आणि नागपूर किंवा पुण्यात घर मिळवून देण्याची मागणी देखील याचिकेत केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी ता. 6 डिसेंबर रोजी होणार आहे. सन 2011 मध्ये नगराळे पती पत्नीचा घटस्फोट झाला आहे. कुटुंब न्यायालयाने त्यांना रुपये 20000 पोटगी मंजूर केली आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी पत्नीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT