hemant.jpg 
मुंबई

हेमंत नगराळे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त, परमबीर सिंह यांना हटवलं

दीनानाथ परब

सचिन वाझे प्रकरणाचा अखेर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फटका बसला आहे. राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. परमबीर सिंह यांना पदावरुन दूर करण्यात आलं आहे. त्यांच्याजागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानबाहेरील स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर फेरबदलाची चर्चा सुरु झाली होती. आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल असे बोलले जात होते. पण गृहमंत्र्याचा राजीनामा घेणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले. त्यानंतर परमबीर सिंह यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली. कालपासून महाविकास आघाडी सरकारच्या बैठका सुरु होत्या. 

काल रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर बैठक झाली. त्यानंतर आज सकाळी सुद्धा महत्त्वाची बैठक झाली. आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे बैठकांचे सत्र सुरु होते. त्याचवेळी पोलीस आयुक्तांची बदली होणार याची कुणकुण लागली होती. अखेर आज संध्याकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करुन पोलीस खात्यातील बदलांची माहिती दिली. 

रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी सोपवण्यात आलीय. मुंबईत पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.   

सचिन वाझे प्रकरणात गृहविभाग आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पियो कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास आधी राज्य पोलिसांकडे होता. त्यावेळी या प्रकरणाच्या तपासात विशेष प्रगती दिसली नाही. पण एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हातात घेतल्यानंतर एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होत गेले. सचिन वाझेना अटक झाली. विरोधकांनी या सर्व प्रकरणात गृहखात्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या सचिन वाझे यांना इतके अधिकार कसे काय दिले जातात? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर प्रतिमा सावरण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर सर्वाचे खापर फोडून त्यांना पदावरुन दूर केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT