high_court_ 
मुंबई

जामीन मिळणे सरसकट अधिकार नाही - हायकोर्ट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बंद्याला जामीन मिळण्याचा अधिकार आहे असा दावा कारागृहातील बंदी करु शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला जामीन मंजूर करण्याबाबत वर्गवारी करण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने व्यक्त केले आहे.

कोविड 19 साथीमुळे कारागृहातील बंद्यांना बाधा होऊ नये, म्हणून तेथील गर्दी कमी करण्याच्या हेतूने सरकारने समिती नियुक्त केली. त्यासाठी नियम तयार करून संभ्रम निर्माण होऊ नये. यासाठी सहाय्यक भूमिका घेतली, असेही खंडपीठाने म्हटले आहे. कारागृहात असलेल्या एका बंद्याच्या पत्नीने  न्यायालयात जनहित याचिका केली आहे. समितीच्या शिफारशींमध्ये सात वर्षापर्यंत शिक्षा होणा-या बंद्यांंचाच विचार केला जाणार आहे. मोक्का, एमपीआयडी (गुंतवणूक संबंधित), मनीलौण्ड्रिंग आदी गंभीर आरोप असलेल्या आरोपींना हा जामीन मिळणार नाही, त्यासाठी संबंधित न्यायालयात दाद मागावी, असे समितीने स्पष्ट केले आहे. 

या तरतुदीला याचिकेत विरोध केला आहे. गंभीर आरोप असले तरी राज्य सरकारने हा भेदभाव केला आहे, तसेच या आरोपांमध्येही पाच-सहा वर्षांपर्यंत शिक्षा होत असते, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. समिती अशाप्रकारे शिफारशी करु शकतो आणि त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी (ता १४) रोजी आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरुन बंद्यांना जामीन देण्याबाबत सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. कारागृहात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून ही कार्यवाही तातडीने करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT