मुंबई

High Court: उच्च न्यायालयाच्या इमारतीचे तत्काळ ऑडिट करा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai NewsL मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी तातडीने सेफ्टी ऑडिट करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच गोरेगाव येथील भूखंड उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी सोयीस्कर नसल्याचे मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर आणि इतर वकिलांनी २९ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीबाबत पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो याचिका दाखल करून घेतली या याचिकेवर आज (ता.७) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.भूषण गवई आणि न्या. जे बी पारडीवाला यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

त्यावेळी न्यायालयाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळ्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या इमारतीचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच राज्याचे मुख्य सचिव व केंद्रीय अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी अशा सूचना केल्या.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारने सक्रिय व्हावे आणि नवीन इमारतीसाठी वांद्रे पूर्व येथे दिलेली जमीन तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाकडे सोपवावी, जेणेकरून नवीन उच्च न्यायालय संकुलाचे बांधकाम सुरू होईल. नवीन इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या जागेचे रेखाचित्र जलद काढण्यासही खंडपीठाने सरकारला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT