मुंबई

तोंडी तलाक देणाऱ्या पतीचा जामीन उच्च न्यायालयाकडून नामंजूर

सुनिता महामुनकर

मुंबई : तिहेरी तलाकद्वारे पत्नीला तडकाफडकी घटस्फोट देणाऱ्या मुस्लिम पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. 

मुस्लिम महिला संरक्षण कायद्यानुसार तोंडी तलाक देण्यावर कायद्याने बंदी आहे. अर्जदार पतीच्या विरोधात त्याच्या तिसऱ्या पत्नीने भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायदानुसार फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. पहिल्या दोन्ही पत्नींना त्याने तलाक दिला आहे. 

तिसऱ्या पत्नीने पतीच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा निकाह झाला. त्यावेळी त्याने तिचे काही व्हिडीओ आणि फोटो काढले आणि त्यावरून सतत तिला धमकावत होता, तसेच व्हॉट्सपवरही त्याने पत्नीला ब्लॉक केले होते. पहिल्या पत्नीच्या मुली घरी आल्या तेव्हा बाचाबाची होऊन त्याने तीला तोंडी तलाक दिला आणि माहेरी पाठविले आहे. 

याप्रकरणात अटक होण्याच्या भितीने त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. माझ्यावर खोटे आरोप केले असून दोन्ही अल्पवयीन मुलींबरोबर पत्नी नीट वागत नाही, असा युक्तिवाद त्याच्याकडून करण्यात आला.

सुनावणी नंतर न्या सारंग कोतवाल यांनी हा अर्ज नामंजूर केला. तक्रारीमध्ये केलेले आरोप गंभीर असून त्यावर चौकशी व्हायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. आरोपीने तक्रारदाराला चुकीच्या पध्दतीने तलाक दिला आहे. त्यामुळे त्यावरही तपास व्हायला हवा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

------------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT