Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News : कोर्टाच्या आदेशाने गोराईला पाणी ; दररोज १० टँकर पुरवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या गोराईतील रहिवाशांना उच्च न्यायालयाने दिलासा देताना दररोज दहा हजार लिटर क्षमतेचे दहा टँकर पाणी पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ८) दिले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे पालिकेचे कर्तव्य असून यातून पालिका हात झटकू शकत नाही, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या गोराईतील रहिवाशांना उच्च न्यायालयाने दिलासा देताना दररोज दहा हजार लिटर क्षमतेचे दहा टँकर पाणी पुरवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ८) दिले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे पालिकेचे कर्तव्य असून यातून पालिका हात झटकू शकत नाही, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.

बोरिवली पश्चिमेतील गोराई गावात पालिकेकडून कमी दाबाने पुरवठा होत असून पाण्याअभावी रहिवाशांचे हाल होत आहेत. सात हजार कुटुंबे या ठिकाणी राहत असून सुमारे दोन हजार कुटुंबीयांकडे पाण्याचे नळ आहेत; मात्र यातून पाणी येईनासे झाले आहे.

याप्रकरणी गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, सक्शन टॅंक आणि पंप बांधल्याने येथील लोकांना पाण्याची समस्या भासत आहे. सध्या येथील रहिवाशांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सक्शन टॅंक आणि पंपाचे काम पूर्ण झाल्यावर रहिवाशांना जादा दाबाने पाणीपुरवठा होईल. सकाळी चार, संध्याकाळी चार आणि रात्री दोन अशा १० टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश खंडपीठाने पालिकेला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT