MP Sanjay Raut sakal
मुंबई

राऊत अडचणीत?, महिलेच्या अटकेप्रकरणी HC चे पोलीस आयुक्तांना निर्देश

मुंबई पोलिस आयुक्तांना उच्च न्यायालयाचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई पोलिस आयुक्तांना उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर आरोप(Allegation) केल्यानंतर खोट्या प्रकरणात महिलेला अटक केली,असा आरोप करणाऱ्या याचिकेवर(Petition) मुंबई पोलिस आयुक्तांनी(Mumbai Police Commissioner) खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.(High Court gives instructions of Shivsena MP Sanjay raut case to Mumbai police commissioner)

राऊत यांच्या विरोधात छळवणूक आणि धमकावल्याचा आरोप करणारी याचिका डॉ स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. यावर मंगळवारी न्या एस एस शिंदे आणि न्या नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकादाराकडून एड आभा सिंह यांनी बाजू मांडली. याचिकादाराने फौजदारी याचिका केल्यावर त्यांना पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करुन अटक केली, असे त्यांनी सांगितले. मात्र याचिकेत याचा उल्लेख केला नाही, असे खंडपीठाने निदर्शनास आणले. तसेच याबाबत याचिकेत सुधारणा करण्याची मुभा न्यायालयाने दिली.

मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत चौकशी करावी आणि गुरुवारपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. याचिकिदाराने माहीम आणि वाकोला या दोन पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही असा त्यांचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी माझा पाठलाग अज्ञात व्यक्तिंनी केला आणि माझा व माझ्या कुंंटुबियांच्या जीवाला धोका निर्माण केला. यामध्ये राऊत यांचा हात आहे असा आरोप महिलेने केला आहे. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT