मुंबई

भिंवडीमधील इमारत दुर्घटनेची उच्च न्यायालयाकडून दखल; राज्य सरकारसह अनेक महापालिका प्रतिवादी

सुनिता महामुनकर


मुंबई : भिंवडीमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. परवानगी नसताना बांधकामे उभी कशी राहतात, असा सवाल राज्य सरकार आणि सर्व महापालिकांना केला आहे. धोकादायक इमारतींमुळे जिवित आणि मालमत्ता हानी होऊ नये म्हणून सरकार काय करत आहे, असेही खंडपीठाने विचारले आहे.

मुंबई आणि भिंवडीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे झालेल्या जीवितहानीची दखल न्यायालयाने घेतली असून आज स्युमोटो याचिका दाखल केली. भिंवडीमधील दुर्घटना अत्यंत गंभीर असून 37 जणांना जीव गमवावा लागला आहे, अशी चिंता मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. मुंबईमध्येही अशीच गंभीर परिस्थिती आहे असे समजते, असे खंडपीठ म्हणाले.
 राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, भिंवडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकांना नोटीस बजावून न्यायालयाने प्रतिवादी केले आहे. अनधिकृत धोकादायक इमारतींबाबत सविस्तर तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 
विनापरवाना बांधकाम कशी बांधली जातात. निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात का आणले जात आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. धोकादायक इमारतींच्या सुरक्षेबाबत काय व्यवस्था केली आहे, याची माहिती तीन आठवड्यात दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकार करीत असलेल्या उपाय योजनांची माहिती दाखल करु, असे कुंभकोणी यांनी सांगितले. भिंवडीमधील तीन मजली इमारत सोमवारी कोसळली होती. 

मुख्य न्यायमूर्ती न्यायालयात उपस्थित राहणार
या आठवड्यापासून मुख्य न्यायमूर्ती प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून काम करणार आहेत, असे आज त्यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मोजक्या वकिलांनी सुनावणीला हजेरी लावावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाचे काम सुरू आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT