Mumbai-High-Court 
मुंबई

मॉल पार्किंगसाठी शुल्क वसुली का नको?; हायकोर्टाचा पीएमसीला सवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यातील मॉलमालकांना पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मॉलमालकांनी पार्किंगचे शुल्क वसूल करु नये, असा कायदा आहे का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

एमआरटीपी आणि एमएमसी कायद्यानुसार अशी कोणतीही तरतूद नाही, ज्यामध्ये खासगी जागेच्या वापरास परवानगी दिली, तर त्याची शुल्क वसुली करता येत नाही. पुणे महापालिकेने कायद्याच्या निकषावर अमंलबजावणी करायला हवी, केवळ नोटीस बजावून कारवाई करता कामा नये, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. पुण्यातील मॉलमालकाने ऍड. सतीश तळेकर यांच्यामार्फत केलेल्या रिट याचिकेवर आज (सोमवार) न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

महापालिकेने जूनमध्ये याचिकादाराला नोटीस बजावली होती. मॉलमधील पार्किंगच्या जागेचा वापर करताना शुल्क आकारणी करू नये, पार्किंग मोफत द्यावे, असे यामध्ये म्हटले होते. मॉलसाठी 35 टक्के अधिक चटईक्षेत्र अतिरिक्त शुक्‍ल आकारणी न करता दिले असल्यामुळे त्यावर पार्किंगशुल्क वसुल करता येणार नाही, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT