Diva dahi handi festival sakal media
मुंबई

दिव्यात भाजपकडून काळ्या फीत बांधून प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव साजरा

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : हॉटेल, वाईन शॉप बाहेर होणारी गर्दी राज्य सरकारला चालते, मात्र हिंदू सणांसाठी (hindu festivals) होणारी गर्दी (crowd) सरकारच्या डोळ्यात खुपते. सणांवर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा (restrictions) निषेध करीत मंगळवारी दिवा (diva) येथे भाजपा युवा मोर्चा दिवा मंडळाने प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव (dahi handi festival) साजरा केला. काळ्या फीत (black ribbons) लावत युवकांनी हंडी फोडली.

ठाण्यातील दिवा शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दिवा मंडळ तर्फे महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांच्या विरोधात प्रतिकात्मक दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. हिंदू सणांवर निर्बंध लादण्याचे प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहेत. हे सरकार महाविकास आघाडी नसून म्हाभकास तिघाडी सरकार आहे. या सरकारचा तसेच त्यांनी लादलेल्या निर्बंधांचा निषेध म्हणून आज हा प्रतिकात्मक हंडी उत्सव साजरा करण्यात आल्याचे यावेळी भाजपा युवा कार्यकर्त्यांनी सांगितले.

हंडी फोडल्यानंतर भाजपा युवा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी युवा मोर्चा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हाउपाध्यक्ष निलेश पाटील, भाजपा दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत, जयदीप पाटील, श्रीधर पाटील, युवराज यादव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT